दारू पिवून एखाद्या माकडाने जर दंगा घातला तर? तुम्ही म्हणाल माकड कधी दारू पिते का? पण, बेंगळुरुमधील एक माकड काम्मनाहली येथील दिवाकर बारचे नेहमीचे ग्राहक आहे. ते रोज थोडी दारू आणि उरलेले अन्न खायला येथे येते.काल रात्री या माकडाने जरा जास्तच दारू पिली आणि बारमध्ये मद्यधूंद माकडाने प्रचंड धुमाकूळ घातला. या माकडामुळे बारमधील काही लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. दंगा घालतच ते माणसांचा पाठलाग करत रस्त्यावर आले. काही प्राणीप्रेमींनी त्या माकडाला खाद्यपदार्थ कोल्डड्रिंक्स दाखवून शांत करण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी मध्यरात्री दंगा घालून दमल्यावरच ते माकड शांत झाले. त्या वेळी एका रिक्षा चालकाने त्याला पकडले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews